spot_img

अरेच्चा, आमदारकीचे स्वप्न पाहणारे भावी आमदार सध्या भाड्याच्या खोलीत ! तिकीट मिळाले तर निवडणूक नाही तर घरवापसी होणार?

मेहकर : (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज

वृत्तसेवा)विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहे. त्या दृष्टीने विविध पक्षातील काही हौसे नवसे मेहकर मतदारसंघात जनतेशी संपर्क करत आहेत. मेहकर मतदारसंघात विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले असुन मेहकरात भाड्याने खोली करुन तिकीट मिळाले तर आमदार की ची तयारी , नाही तर घरवापसी करायची असा आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी आमदारांची झाली आहे.

 

मेहकर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी बरेच नेते उत्साहीत आहेत. मेहकर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागुन आहे. विधमान आमदार संजय रायमुलकर यांना काट्याची टक्कर देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

उबाठा गटाकडून राज्याच्या गृह विभागाचे सेवा निवृत्त सहसचिव सिध्दार्थ खरात यांनी शिवबंधन बांधले म्हणून गावोगावी बॅनर बाजी करुन मीच उमेदवार असल्याचे बोलत आहे.मग प्रकाश डोंगरे , डॉ गोपाल बछिरे राजकीय घडामोडी झाल्या नंतर तटस्थपणे भुमिका घेऊन उ बा ठा गटाच्या शिवसेना कार्यकर्ते सोबत घेतले व ते आमदार कि साठी हगदार नाहीत का? उद्धव ठाकरे यांनीच सिध्दार्थ खरात यांना आमदार म्हणून जाहीर केल्याचे मतदारसंघात फिरत आहे.

प्रकाश डोंगरे व डॉ.गोपाल बछिरे , बाशिंग बांधून तयार आहेत . कोणत्याच गावात जनसंपर्क नसणारे सिध्दार्थ खरात नुसते राजकीय पुढाऱ्यांसोबत मेहकरात फोटो सेशन करत आहे.

काँग्रेस ला सुध्दा जागा मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणून फक्त येणारा काळच ठरवणार भावी आमदारकिचे स्वप्न पाहणाऱ्या सिध्दार्थ खरातांना तिकीट मिळाले तर लढु नाही तर घरवापसी होणार असल्याची शिवसेना नेत्यांची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या