spot_img

गाव तिथे सुविधांसह संविधान भवन निर्माण करण्याचा संकल्प – आमदार संजय रायमुलकर

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

मेहकर लोणार तालुक्यात अनेक गावांमधे बौद्धविहारांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये सभामंडप , रस्ते बांधकाम केले आहे.गाव तिथे संविधान भवनाची निर्मिती करण्याचा माझा संकल्प आहे ,असे विचार आमदार संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले.

देऊळगावमाळी येथील विश्र्वशांती बुद्धविहार येथे आमदार रायमुलकर यांच्या प्रयत्नातून २५ लाख रुपये खर्चून भव्य सभामंडपाचे बांधकाम करण्यात येत असून त्याची पाहणी त्यांनी केली.बुद्ध विहार समितीच्या वतीने याबद्दल संजय रायमुलकर यांचा सत्कार भास्कर गवई , प्रा.गजेंद्र गवई ,किसन बळी यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी सत्काराला उत्तर देतांना रायमुलकर यांनी वरील संकल्प केल्याचे सांगितले.

मेहकर येथील अशोक वाटिका सभामंडप बांधकाम , सौंदर्यीकरण व इतर सुविधांसाठी दोन कोटी रुपयांची कामे करण्यात येत असून मेहकर लोणार तालुक्यात बुद्ध विहार आणि मागासवर्गीय वस्ती विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला. असल्याचे आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले.भविष्यात सर्व ठिकाणी संविधान भवन निर्मिती करण्याचा व तेथे स्पर्धा परीक्षांची पुस्तके,संगणक आदी सुविधा उपल्ब्ध करून देण्याचा आपला संकल्प असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.यावेळी सामुहिक बुद्ध वंदना करण्यात आली.

यावेळी अर्जुन गवई, भिकाजी गवई, सिद्धार्थ गवई, शशिकांत जाधव, केशव गवई, रामदास हिवाळे , संतोष मोरे, सदाशिव गवई, राहुल जाधव, विलास गवई, विनोद फलके, क्रांतीसुर्य व्यायामशाळेचे अध्यक्ष किसन बळी , सुदर्शन मगर, डॉ. दत्ता सुरुसे ,रामेश्वर भिसे प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या