spot_img

रक्तदान करून हिंदू मुस्लिम युवकांनी साजरा केला ईद ए मिलादचा सण………. खून मजहब नहीं देखता…… सामाजिक कार्यकर्ते डॉ. कृष्णा हावरे  105 दात्यांनी केले रक्तदान….

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून स्थानिक जानेफळ येथील मुस्लिम युथ फॉउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कोणया वेळी अतिथी म्हणून काँग्रेस कमिटी ता. अ. देवानंद पवार, ठाणेदार अजिनाथ मोरे, मा. पं. स. सदस्य गजानन वडणकर, उपसरपंच विजय कृपाळ,डॉ. धनराज राठी,सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज ठाकरे, डॉ. साखरे, डॉ. सोळंखे,डॉ. दीपक गवई,शिवसेना नेते हिम्मतराव आवले, माजी सरपंच किशोर गव्हाड विश्वासराव सवडतकर, राजू खंडागळे, गायकवाड सर, शिवसेना शहर प्रमुख सचिन राजूरकर उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ नेते विश्वासराव सवडतकर यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सामाजिक कार्यकर्ते डॉ. कृष्णा हावरे यांनी जालीयनवाला बाग हत्याकांडाचे उदाहरण देत 76 मुस्लिमांनी आपल्या देशासाठी बलिदान केल्याचे सांगितले. रक्त हे रक्त असते, ज्याला त्याची गरज पडते त्याला त्याचे महत्त्व कळते. “खून मजहब नही देखता ” इसलिये खून ” नालीयोमे नही,नाडीओमे बहना चाहिए. असे प्रतिपादन केले. यानंतर ठाणेदार मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोखा कायम राखावे असे आवाहन केले.

त्यानंतर स्थानिक जानेफळ शिवसेनेच्या वतीने ईद-ए-मिलाद सारख्या पवित्र सणाला हीच रक्तदानाची राष्ट्रभावना जागृत केल्याबद्दल शिवसेना नेते किशोर गव्हाड, जेष्ठ नेते विश्वासराव सवडतकर, हिम्मतराव आवले, शिवसेना शहरप्रमुख सचिन राजूरकर, आकाश सवडतकर, झळके यांनी आयोजक नवयुवकांचा सत्कार केला .या युवकांमध्ये असिफ पठाण, शेख शाहरुख, जुनेद खान, शे. फैजल,रईस खान,सैय्यद नजीम, इरफान मिर्जा, रोनक पठाण, सैय्यद साबीर, सय्यद अफरोज, शे. सोहिल, शे. समीर, शे. तन्वीर, मुदास्सीर शाह, ओवेस तांबोळी, जुनेद तांबोळी, शे. असिफ, शे. वसीम यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच असिफ मिर्जा,आशरफ पठाण, जीवन आर ओचे मालक अजीसभाई यांचा सत्कार करण्यात आला. या रक्तदान शिबिराला राजकीय नेते, पत्रकार बांधव यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिफ मिर्झा यांनी तर आभार असरफ पठाण यांनी मानले. यावेळी मुस्लिम समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.पत्रकार सैय्यद जाबीर, हिम्मतराव आवले यांच्यासह 105दात्यांनी रक्तदान केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या