spot_img

आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते रामदेवबाबा सभा मंडपाचे भूमिपूजन

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्तसेवा)

सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सोयीचे व्हावे म्हणून मेहकर शहरात जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून विविध ठिकाणी सभा मंडपाचे काम सुरू असून ५० लाख रुपये खर्चून बांधण्यात येत आहे रामदेव बाबा मंदिर परिसरातील सभा मंडपाचे भूमिपूजन आमदार रायमुलकर यांच्या हस्ते झाले.

मेहकर लोणार तालुक्यातील विविध गावांमध्ये 300 पेक्षा जास्त सभा मंडपांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यामुळे गावातील सार्वजनिक ,धार्मिक कार्यक्रमांसाठी चांगली सोय झाली असून मेहकर शहरातही तीन कोटी रुपये खर्चून अनेक सभा मंडपांचे बांधकाम करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर ही कामे प्रस्तावित सुद्धा आहेत. स्थानिक रामदेव बाबा मंदिराच्या परिसरात २५ लाख रुपये खर्चून यापूर्वी सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. पण ही जागा अपुरी पडत असल्याने भाविकांच्या मागणीनुसार आमदार रायमुलकर यांनी नवीन सभा मंडपासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

सदर सभा मंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजय रामुलकर यांच्या हस्ते झाले यावेळी रामदेव बाबा संस्थांनचे सुनील गट्टानी ,पुरुषोत्तम सिकवाल, अनिल पांडे, विजय तोष्णीवाल, उमेश काबरा, सचिन सिकवाल ,मनोज अग्रवाल ,विनोद अग्रवाल, अमित अग्रवाल, दीपक अग्रवाल, योगेश मिश्रा ,शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर,विकास जोशी,युवासेनेचे तालुकाप्रमुख भूषण घोडे,गौरव झंवर, भरत सारडा, संतोष मलोसे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी संजय रामुलकर यांच्या हस्ते आरती करण्यात येऊन महाप्रसाद वितरण करण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या