spot_img

वारकरी महामंडळाकडून जिल्ह्यात ‘महादिंडी; महादिंडीत वारकऱ्यांसोबत श्वानाची हजेरी !

मेहकर (अनिल मंजुळकर : रोखठोक न्युज वृत्तसेवा )

राज्याला वारकरी संप्रदायाने आध्यात्मिकतेतून जीवन कल्याणाचा मार्ग दाखविला आहे. महाराष्ट्र संतांची भूमी असून, मानव जातीच्या कल्याणासाठी संत अहोरात्र झटले आहेत. संतांची महती जितकी सांगावी तितकी कमीच. वारकरी संप्रदायाने संत परंपरेचा वारसा पुढे नेला आहे. बुलढाणा जिल्ह्याला देखील आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्व लाभलेले आहे.

संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने पुनीत झालेल्या भूमीतून राज्य वारकरी महामंडळाने महादिंडीचे आयोजन केले असता श्वान देखील वारकऱ्यांसोबत चालत आहे.


जया एकादशीच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून २९ ऑगस्ट रोजी महादिंडी निघाली आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव असा या दिंडीचा प्रवास असणार आहे. दरम्यान, मेहकर तालुक्यात ही महादिंडी पोहोचली असून, दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामूअण्णा महाराज शिंगणे हे
महादिंडी सोहळ्याचे नेतृत्व करीत आहेत. व्यवस्थापन विदर्भ प्रांत अध्यक्ष ह.भ.प राजेंद्र महाराज तळेकर हे करीत आहेत. राज्य संघटनेतील ह.भ.प रांजणे पाटील यांचे समवेत जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली आहे. या रथासोबत श्री श्री 1008 स्वामी अमोलानंद गिरी महाराज संचितानंद आश्रम सावत्र दिंडीत सहभागी झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची हजेरी सोहळ्यास राहणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या