मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
पुणे येथील बैठकीत वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी मा. जगन्नाथजी फुलारे साहेब छ.संभाजी नगर यांची निवड झाल्याने वडारसमाजात एकच जल्लोष करण्यात आला.
वडार समाज संघ ही संघटना समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने शासनस्तरावर सनदशीर मार्गाने आपल्या हक्कासाठी न्याय्य लढा देत आहे.परंतु अनेक वेळा उपोषणे , आंदोलने करूनही सरकारी धोरणे उदासीन असल्याने समाज सर्वांगाने पिढ्यान्- पिढया गरीबीत जीवन व्यतित करत आहे. यांत्रिकीकरणाने पारंपारिक उद्योग,व्यवसाय,कामधंदे संपलेत.
रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याने मुलां- बाळांना शिक्षण घेता येता नाही यासारख्याच अनेक गंभीर समस्यातून वर काढण्यासाठी आणि वंचित समाजास न्याय मिळवून देण्यासाठी चा लढा अधिक तीव्रतेने गतिमान करण्यास सक्षम नेतृत्व म्हणून उच्चशिक्षित,अभ्यासू व खंबीर व्यक्तीमत्व मा.जगन्नाथ फुलारे साहेब छत्रपती संभाजी नगर यांची राज्य समन्वय समितीने एकमताने वडार समाज संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. सभेच्या अध्यक्षपदी मा.राकेशजी विटकर( माजी अध्यक्ष )हे होते.
सभेत अन्य पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली.
कार्याध्यक्ष-श्री. रामचंद्र मंजुळे,
ज्येष्ठ उपाध्यक्ष-श्री.बी.के. गायकवाड,
सचिव- श्री.डॉ. लक्ष्मण बामणे,
उपाध्यक्ष- श्री.संजय देवकर,
सरचिटणीस -श्री. दिलीप गुंजाळ,
कोषाध्यक्ष-श्री. रमेश जेठे, या
नवनिर्वाचित अध्यक्षांनी संघटन बांधणीसह समाजातील बेरोजगार तरुणांसाठी स्वयंरोजगार मेळावा मार्गदर्शन तसेच शासनस्तरावर समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने अभ्यासपूर्ण लढा देण्याचा संकल्प ही व्यक्त केला. सभेस विदर्भ अध्यक्ष महादेवराव कुसळकर, रामदास सुरे( से.नि. P.S.I.) मनोहर विटकर, अशोक कुलाल व सर्व समन्वय सदस्य उपस्थित होते.