spot_img

महिला सन्मान शिवसेना रथाचे मेहकर येथे उस्फुर्त स्वागत

मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने महिलांच्या उत्कर्षासाठी , सक्षीकरणासाठी राबविलेल्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा , तळागाळातील घटकांना त्याची माहिती व्हावी म्हणून काढण्यात आलेल्या महिला सन्मान रथाचे मेहकर येथे महिलांनी जोरदार स्वागत केले.

महिलांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने त्यांना आर्थिक,सामाजिक ,शैक्षणिक पातळीवर सशक्त व सुरक्षित करण्यासाठी लेक लाडकी योजना, लखपती दिदी योजना , महिला सन्मान योजना महायुती सरकारने आणल्या असून त्याची प्रभावी अंमलजावणी सुरू आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेद्वारे प्रतीमहिना १५०० रुपये थेट महिलांच्या बँकखात्यात जमा करणे सुरू झाले आहे. अन्नपूर्णा योजनेतून तीन गॅस सिलेंडर दरवर्षी मोफत देण्याचा निर्णय, बचत गटांच्या महिलांना वाढीव खेळते भांडवल शासन उपलब्ध करून देत आहे.प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना अर्थसहाय्य केले जात आहे,अशी माहिती पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख शिल्पाताई बोडखे यांनी यावेळी दिली.
योजनांची माहिती आणि राखी पाठविल्याबद्दल आभार मानणारे मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महिलांना यावेळी प्रदान करण्यात आले.शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के , तालुका प्रमुख सविता दांदडे, शहर प्रमुख वैशाली सावजी ,लीलाताई साखरे,दुर्गाबाई शिरे, गोदावरी काकडे, गंगाबाई गारोळे, आरती दीक्षित , यमुना फगाळ, कालिंदा फंगाळ, कृष्णा सरकटे, गीता चोपडे , वैशाली गाभने,वनिता शिंदे , शीतल डोळस , आरती मोतेकर, लीलाबाई खिल्लारे, तृप्ती महाले , शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळुकर , नीरज रायमुलकर, भास्कर राऊत , युवासेनेचे

र राऊत , युवासेनेचे भूषण घोडे, मुरलीधर गवई, ओम सौभागे, भागवत भिसे , संजय चव्हाण,तौफिक कुरेशी, मंगेश गायकवाड , गजानन म्हस्के , विलास आखाडे आदी यावेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या