मेहकर ( अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्तसेवा )
शालेय विद्यार्थ्यांसठी पोषण आहार तयार करणाऱ्या महिला भगिनींना मिळणारा मोबदला अपुरा असून त्यात वाढ होण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार तयार करणाऱ्या मेहकर लोणार तालुक्यातील रोजंदार महिला आणि पुरुष यांच्या सिटू संघटनेचा मेळावा स्थानिक जिल्हापरिषद विद्यालयात आज पार पडला. त्यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणात पोषण आहार बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा वेदना मांडल्या. लाडकी बहीण योजनेचा महिलांना मोठा लाभ दिल्याबद्दल उपस्थित महिलांच्या वतीने रेखाताई गवई श्रीमती गारोळे यांनी आमदार संजय रायमुलकर यांचा सत्कार केला . महिलांनी त्यांना राखी बांधली.
प्रास्ताविक भाषणातून सिटू संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान राठोड यांनी सांगितले की, पोषण आहार तयार करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना प्रतिदिन केवळ ८४ रुपये इतका कमी मोबदला मिळतो. त्यांच्या मानधनात वाढ होणे आवश्यक आहे. इतरही मागण्या त्यांनी आपल्या भाषणातून विषद केल्या. आपल्या भाषणात आमदार रायमुलकर पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार हे सर्व घटकांना न्याय देणारे असून शेतकरी ,कामगार, महिला, विद्यार्थी आदींसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने योजनांचा लाभ दिला आहे. लाडकी बहीण योजना ही निरंतर सुरू राहणार आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
पोषण आहार कर्मचारी यांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर देवकर ,संघटनेचे संजय
ज्ञानेश्वर देवकर ,संघटनेचे संजय वाघोते , अरुण सनीसे मलकापूर, सुजित शिरसाट मोताळा, विनोद उंबरकर यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी ही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन समाधान राठोड यांनी केले.