spot_img

प्रा.सुभाष मगर यांना ‘आदर्श साहित्यिक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार’ जाहीर

मेहकर :- (अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्तसेवा )

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती, महाराष्ट्र राज्य’ आयोजित अमृत गौरव पुरस्कार २०२४ साठी मेहकर, जिल्हा बुलढाणा येथील सुप्रसिद्ध कवी-गझलकार प्रा. सुभाष भिकाजी मगर यांना ‘आदर्श साहित्यिक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यासंबंधीचे निवड पत्र व निमंत्रण त्यांना प्राप्त झाले आहे.

प्रा. सुभाष मगर यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वांद्रे (पश्चिम) मुंबई येथील इतिहासप्रसिद्ध नॅशनल लायब्ररी सभागृहामध्ये रविवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
सदरहू कार्यक्रमासाठी मुख्य संयोजन समितीतील मा. प्रा. नागेश हुलावळे, मा. रमेश पाटील, मा. प्रमोद सूर्यवंशी, मा. योगेश हरणे आदी मान्यवर तथा इतर सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रा. सुभाष मगर हे ख्यातनाम कवी-गझलकार असून ते उत्तम निवेदक, व्याख्याते व हार्मोनियमपटू आहेत. यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग दोन वेळा त्यांचा निमंत्रित गझलकार म्हणून सन्मान झालेला आहे. त्यांना यावर्षीचा हा आदर्श साहित्यिक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जिल्हाभरातून व साहित्यविश्वातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या