spot_img

मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह दुरुस्तीसाठी आमदार रायमूलकर यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 92 लाख मंजूर

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

मेहकर, लोणार येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांच्या विशेष दुरुस्तीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आमदार संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून दोन कोटी 92 लाख 62 हजार रुपये मंजूर झाले आहेत.

मेहकर, लोणार येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहांच्या अवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधून सदर वसतिगृहांच्या विशेष दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रायमूलकर यांनी सामाजिक न्याय विभागाकडे केली होती.सदर विभागाने ता. 19 ऑगस्ट रोजी शासनाच्या अवर सचिव प्रज्ञा वि. देशमुख यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करून भरीव निधी मंजूर केला आहे.

मागासवर्गीय मुलींचे मेहकर येथील शासकीय वसतिगृह दुरुस्तीसाठी 49 लाख 96 हजार 900 रुपये तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह मेहकर च्या दुरुस्तीसाठी 44 लाख 67 हजार 200 रुपये आणि मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह लोणार साठी 98 लाख 98 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा लोणार च्या दुरुस्ती कामांसाठी 99 लाख रुपये सामाजिक न्याय विभागाने मंजूर केले आहेत.त्यामुळे मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहांची स्थिती आणखी चांगली होण्यासाठी निश्चितपणाने मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या