घाट नांद्रा ( ज्ञानेश्वर जाधव)
आपल्या “रोखठोक ” कीर्तनातून प्रबोधन करणारे, विदर्भभूषण ह.भ.प सत्यपाल महाराज हे कार्यक्रमानिमित्त मंगळवारी मेहकर येथे आले होते. याप्रसंगी संत गजानन महाराज संस्थान संगम फाटा गोमेधर येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी संत गजानन महाराज संस्थान गोमेधरचे अध्यक्ष तथा पत्रकार अनिल मंजुळकर यांनी सत्यपाल महाराजांचा यथोचित सत्कार केला. त्यांच्यासह ज्ञानेश्वर जाधव, गोविंद वाते, रामा धनेकर, माजी उपसरपंच सुरेश सरदार, खामगाव येथील रामेश्वर दादा घट्टे ,नंदु अमलकार, सुनील विरघट आदींची उपस्थिती होती.