spot_img

मेहकर मतदारसंघातील जलजीवन पाणीपुरवठा योजनांच्या तपासणीसाठी मुंबईहून येणार समिती मंत्री गुलाबराव पाटील यांचा आदेश

 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

जलजीवन मिशनच्या मेहकर लोणार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुंबई येथून तज्ञांचे तपासणी पथक पाठविण्याचा आणि त्रयस्त पक्ष तांत्रिक तपासणी कंपनी मोडीज ला काळ्या यादीत टाकण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुंबई येथे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आमदार संजय रायमूलकर यांनी मेहकर मतदारसंघातील जलजीवन मिशनच्या योजनांच्या बाबत बैठक बोलावण्याची मागणी केली होती.त्यानुसार आज पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कक्षात मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार संजय रायमूलकर, प्रधान सचिव संजय खंदारे, सहसचिव मोहिते, अवर सचिव श्रीमती सातपुते, सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता अजयसिंग, मुख्य अभियंता प्रशांत भामरे उपस्थित होते.
मेहकर लोणार तालुक्यातील जलजीवन योजनेची कामे सध्या प्रगतीत असली तरी कामांना वेग नाही.अनेक ठिकाणी जलस्रोत भुजल सर्वेक्षण खात्याने चुकीचे दिले आहेत.त्या विहिरीना पाणी नाही.


काही ठिकाणी गावातील रस्ते खोदून ठेवलेत.अशा अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्याची मागणी आमदार रायमूलकर यांनी केली होती.मंत्री पाटील यांच्या दालनातील आजच्या बैठकीत रायमूलकर यांनी योजनेतील त्रुटिंचा पाढाच वाचला.

कामांना गती नाही, सुरवातीला अंदाजपत्रके तयार करतांना वीज जोडणी बाबतचा खर्च व्यवस्थित दाखविला नाही, जलस्रोत चुकीचे दिले, त्रयस्त पक्ष तांत्रिक कंपनीने डुंकूनही पहिले नाही आदी अडचणी मांडण्यात आल्या.
त्रयस्त पक्ष तांत्रिक तपासणी कंपनी मोडीज ला काळ्या यादीत टाकण्याचे आणि मेहकर लोणार तालुक्यातील सर्व पाणी योजनांची सखोल तपासणी करण्यासाठी मुंबई येथून तज्ञांचे पथक पाठविण्याचा निर्णय मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर करून त्याची त्वरित अंमलबजावणी कारण्याचे आदेश दिले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या