spot_img

वाहतुकीच्या गर्दीत गुदमरत आहे मेहकर ! चौकाचौकात वाहतुकीची कोंडी; वाहतूक पोलीस करतात तरी काय ?

मेहकर : (अनिल मंजुळकर)

मेहकर शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या वाहतुकीचा तनाव असूनही, मेहकर शहराचे वाहतूक पोलीस करतात तरी काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
तालुक्याचे ठिकाण असल्याने मेहकरात गर्दी जमणे नेहमीचे झाले आहे. रस्त्याची लांबी – रुंदी कमी असल्याने तर वाहतुकीची समस्या जरा जास्तच होते.

असे असताना शहरातील गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, वाहतुक कोंडी सुरळीत सोडवली पाहिजे.. असे त्रस्त नागरिक सांगतात. मात्र, प्रत्यक्षात वाहतूक पोलीस हजर नसतात हे चित्र आहे.

दिवसंदिवस होणारी समस्या कोण सोडवणार ? नागरिकांनी समस्या कोणासमोर मांडावी ? असे सांगण्यात येते. शाळा, कॉलेज व क्लासेसच्या विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय.. पोलिसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे…

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या