spot_img

महिलांच्या उत्कर्षासाठी यापुढेही नेटाने कार्यरत राहणार – आमदार संजय रायमूलकर

मेहकर / अनिल मंजुळकर

महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव काम केले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी महिलाभगिनींसाठी आणलेल्या लाडकी बहीण सह इतर सर्व योजना प्रभावीपणे राबविण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत.महिला सक्षमीकरणासाठी नेटाने कार्यरत राहील, असे विचार आमदार संजय रायमूलकर यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे, योजनेचे अशासकीय सदस्य समाधान साबळे, राजीव तांबिले, स्टेट बँक शाखाव्यवस्थापक गिरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.नगरपालिका सभागृहात आयोजित या शासकीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय रायमूलकर होते.प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन आमदार रायमूलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

पाहुण्यांचे स्वागत संदेश मेहकरकर, श्रीमती केंधळे, लोढे, हिवरकर, विद्याताई आराख यांनी केले.महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी दिगंबर खटावकर यांनी प्रास्ताविक भाषणातून सांगितले की, मेहकर तालुक्यातील 49 हजार महिलांची नोंदणी होऊन बहुतांश महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे राज्याच्या इतिहासातील सर्वात धाडसी मुख्यमंत्री असून शेतकरी, कामगार, महिला यासह सर्वसामान्य नागरिकांसाठी शेकडो योजना गेल्या दोन वर्षात लागू केल्या आहेत, असे सांगून संजय रायमूलकर पुढे म्हणाले की, मेहकर लोणार तालुक्यातील 90 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेत नोंदणी केली असून सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल व दरमहासुद्धा रक्कम यापुढेही मिळत राहणार आहे.योजना निरंतर सुरु राहण्यासाठी तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या.मेहकर मतदार संघात 3 हजार 800 कोटींपेक्षा अधिक रकमेची विकासकामे झाली असून भविष्यातही शहरी व ग्रामीण भागाच्या व महिलांच्या उत्कर्षांसाठी अथक कार्यरत राहणार आहे.

रवींद्र जोगी, गिरी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.लाडकी बहीण योजनेच्या मतदारसंघ समितीवर निवड झाल्याबद्दल समाधान साबळे, राजीव तांबिले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन रमेश उतपुरे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कटआऊट ला व आमदार रायमूलकर यांना महिलांनी राख्या बांधून आपला आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या